महंत, महामंडलेश्‍वरांच्या उपस्थितीत संत लक्ष्मण बापूजींना श्रद्धांजली

0

पाल । अखिल भारतीय चैतन्य साधक निर्मात परम पुज्य सतगुरू संत श्री लक्ष्माण चैतन्य बापूजी यांच्या 25 डिसेंबर रोजी आठव्या पुण्यतिथी सोहळा निमित्त देशभरातील शेकडो संत, महंत, महामंडलेश्‍वर आणि हजारो साधक परीवाराकडून भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

23 डिसेंबर पासून श्री वृंदावन धाम आश्रमात तीन दिवसीय नामजत साधना शिबीराचे आयोजन अखिल भारतीय चैतन्य साधक परीवारातर्फे पाल आश्रमाचे गादीपती श्रद्धय गोपाल चैतण्यजी महाराज यांच्या सानिध्यात करण्यात आले. यामध्ये 23 रोजी श्री हरिधाम मंदीराच्या वर्धापन दिवस, 24 रोजी परमपुज्य संत श्री महादेव चैतन्य उर्फ दगडूजी बापुंच्या जयंती महोत्सव तसेच 25 रोजी परमपुज्य संत श्री लक्ष्मण चैतण्यजी यांची आठवी पुण्यतीथी निमित्त सोहळा आयोजित केले होते.

यांची होती उपस्थिती
यावेळी फैजपूरचे महामंडलेश्‍वर स्वामी जनार्दन महाराज, स्वामी नारायण पंथाचे भावजी प्रसाद शाहजी, चाळीसगावचे स्वामी विशुदानंदजी महाराज, अयोध्या येथील वेदनारायणजी महाजरा, कुसंबाचे महंत हरणदासी महाराज, सनवाडाचे स्वामीजी, आमदार हरिभाऊ जावळे, माजी जि.प. सुरेश धनके, माजी आमदार शिरीष चौधरी उपस्थित होते.