म्हसळा : 1 ऑगस्ट महसुल दिनाचे औचित्य साधुन जिल्ह्यात उत्कृष्ट काम करणार्या तलाठ्यांचा सत्कार रायगड जिल्याचे नवनिर्वाचित जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांच्या हस्ते अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला. म्हसळा तालुक्यांतील वरवठणे सजाचे तलाठी सलिम के.शहा यांचा शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र देऊन जिल्हाधिकारी सूर्यवंशी यांच्या हस्ते सत्कार करून त्यांच्या उत्कृष्ट कामाचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी प्रांताधिकारी, तहसीलदार रामदास झळके, मंडल अधिकारी के.एस.देऊळ गावकर आणि महसुल विभागाचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
त्यांच्या या सत्काराबद्दल तहसीलदार रामदास झळके,निवासी नायब तहसीलदार भिंगारे,मंडल अधुकारी के.एस.देऊळगांवकर,मंडल अधिकारी खामगांव मोरे आणि सर्वकर्मच्यार्यांनी सलीम शहा यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.