महसूलची वाळूचोरांना छुपी मदत

0

जिल्हाधिकारी महोदयांनी न्याय द्यावा

हिंगोणे उपोषणकर्त्यांची पत्रकार परिषद; सक्षम समिती नेमून चौकशी करावी

चाळीसगाव – हिंगोने सीम गावालगत तितुर नदीपात्रातून उपसा झालेल्या बेसुमार वाळू मुळे आमच्या गावाचे स्वामित्वधन तसेच पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे ज्या पद्धतीने वाळू चोरांनी गावातील माजी उपसरपंच तुषार चव्हाण यांच्या सहकार्याने 70 ते 75 हजार ब्रास वाळू या नदीपात्रातून चोरून नेली आहे. याबद्दल अनेकदा महसूल विभागाकडे तक्रार करून देखील त्यांनी गांभीर्याची भूमिका घेतला नाही. यामुळे तहसील विभागाच वाळू चोरांमध्ये सामील असल्याचा संशय आहे. वेळोवेळी वाळू चोरी करताना पोलिसांना व तहसीलदारांना फोन करून देखील त्यांच्याकडून मदत मिळाली नाही. मात्र 22 जानेवारी रोजी अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव यांनी व आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना दिलेल्या निवेदनाप्रसंगी बोलत होते.

संबंधित यंत्रणेला आरोपी प्रभाकर चौधरी व संबंधित आरोपी यांचेवर एमपीडीए अंतर्गत कार्यवाही करावी असा आदेश दिल्याने आमचा जिल्हाधिकार्‍यांवर विश्वास वाढला असून त्यांनीच सक्षम अधिकार्‍यांची नियुक्ती करून चौकशी समिती नेमावी व या प्रकरणाबाबत पुढाकार घ्यावा आम्हाला न्याय मिळवून द्यावा तो पर्यंत आमचा उपोषण लढा सुरू राहील, अशी कैफियत हिंगोने वाळू चोरीप्रकरणी उपोषणास बसलेले लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर महाजन, बेलगंगा माजी संचालक बाळासाहेब पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पाटील विकास सोसायटी चेअरमन सयाजीराव पाटील यांच्यासह उपोषणार्थी ग्रामस्थांनी आज पत्रकार परिषदेत केली आहे. यामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे