महसूल कर्मचार्‍यांचे कामबंद आंदोलन

0

अमरावती । अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे येथील सेवानिवृत नायब तहसीलदार, मंडल अधिकारी व तलाठी यांच्यावर शासनाचे कर्तव्य बजावत असताना खोट्या फिर्यादीवर अ‍ॅट्रॉसिटीसारखे गुन्हे दाखल केले आहेत. हे गुन्हे त्वरित मागे घ्यावे व गुन्हा दाखल करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांवर निलंबनाची कारवाई करावी, या मागण्यांसाठी जिल्ह्यातील महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन सुरू केले आहे. महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांना गुन्हे मागे घेण्यासंदर्भात निवेदन दिल होते. संपूर्ण जिल्हाभरात महसूल संघटनेमार्फत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे. धामणगाव रेल्वे येथील नायब तहसीलदार कोहरे, मंडळ अधिकारी व तलाठी हे शासकीय कर्तव्य बजावत असताना त्यांच्याविरोधात कुर्‍हा पोलीस ठाण्यात तक्रारीची कुठलीही शहानिशा न करता गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.