महसूल खात्याची शिर्डी संस्थानला 4 कोटींची नोटीस

0

पुणे ।महसूल खात्याने शिर्डी संस्थानला 4 कोटी रुपयांची नोटीस बजावली आहे. साई समाधी शताब्दीच्या उंबरठ्यावर महसूल प्रशासनाला जाग आली आहे.ब्रिटिश काळात काही भाविकांनी मंदिर परिसरात सरकारी मालकीच्या जागा भाडेतत्वावर घेतल्या होत्या. काहींवर इमारतींची उभारणी झाली.

साईबाबांच्या समाधीनंतर या भाविकांनी सरकारची कुठलीही परवानगी न घेता संस्थानला दान किंवा विकत दिल्या होत्या. पत्रकार प्रमोद आहेर वर्षाभरापासून ‘शिर्डी गॅझेटीअर अनटोल्ड स्टोरीज’ या नावाचे पुस्तक लिहित असून, माहिती गोळा करताना ही बाब समोर आली. साई मंदिर परिसरातील दीक्षितवाडा, म्युझियम व लेंडीबाग ही 27 गुंठे जमीन सरकारी असल्याचे महसूल प्रशासनाच्या लक्षात आले.राहता तहसीलदारांनी जमिनी नियमानुकूल करण्यासाठी मूल्यांकनाच्या 75 टक्के रक्कम (3 कोटी 90 लाख 63 हजार रुपये) नजराणा भरून जमिनीचे कागदपत्रे कायदेशीर करून घेण्याची नोटीस बजावली आहे.