महसूल खात्यातर्फे थकबाकीमुळे कारवाई

0

जळगाव ।मार्च अखेरपर्यंत आपले वसुलीचे टार्गेट पुर्ण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्य निर्देशानुसार थकबाकी धारकांवर कारवाई करण्यात आली आहे. यात महानगरपालिका, तापी पाटबंधारे विभाग, माध्यम प्रकल्प विभाग व गिरणा पाटबंधारे विभाग यांचा समावेश आहे.

तापी महामंडळाकडे गौण खनिजा रॉयलटीचे 3.25 कोटी, महानगरपालिकाकडे अंदाजित 5.85 कोटी रक्कम थकबाकी असल्याने आज प्राथमिक स्थरावर जळगाव तहसिल कार्यालयातर्फे तापी पाटबंधारे विभागात वाहन जप्तीची कारवाई करण्यात आले.

या विभागांवर केली कारवाई
कार्यकारी अभियंता तापी खोरे सर्वेक्षण अन्वेषण विभागाचे वाहन क्र अ‍ॅम्बेसॅडर (एमएच 18 एफ 0140) व बोलेरो क्रमांक (एमएच 19 बीजे 7670), कार्यकारी अभियंता जळगाव माध्यम प्रकल्प विभाग 1 या विभागाची अ‍ॅम्बेसेडर क्रमांक (एमएच 19 बीजे 7178) तर कार्यकारी अभियंता गिरणा पाटबंधारे विभाग यांची जिप क्रमांक (एमएच 19 जी 9949) या वाहनांची जप्ती करण्यात आली असून त्यांची व्यवहाराची सर्व बँकेतील खाती गोठावण्यात आली आहे. याचप्रमाणे येत्या आठवड्यात दिवसात महानगरपालिकेकडे थकबाकी न भरल्यास याठिकाणीही कारवाई होणार असल्याची माहिती तहसिलदार अमोल निकम यांनी दिली. तहसिलदार अमोल निकम, नायब तहसिलदार श्री सातपूते, निवासी नायब तहसिलदार श्री भालेराव यांच्यासह मंडळाधिकारी व तलाठी यांची उपस्थिती होती.