महसूल प्रशासनाची धडक कारवाई : मध्यरात्री गौण खनिज वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई

रावेर : रावेरमधील महसूल पथक सक्रिय झाले असून मध्यरात्री एक वाजता तर पहाटे सहा वाजता प्रत्येकी एक मिळू दोन अवैध गौण खनिज वाहतूक करणारीया ट्रॅक्टर-टॉलीवर कारवाई करण्यात आल्याने अवैध गौण खनिजाची करणार्‍यांच्या गोटात खळबळ उडाली. ही कारवाई तहसीलदार उषाराणी देवगुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. रावेर महसूल विभागाने मार्च महिन्याच्या अखेरीला 30 मार्चच्या रात्री एकच्या सुमारास थोरगव्हाण-सावदा रस्त्यावर अवैध गौण खनिज वाहतूक करणारे ट्रॅक्टर जप्त करून सावदा पोलिस स्टेशन येथे जमा केले तर दुसरे ट्रॅक्टर-ट्रॉली रावेर परीसरात सकाळी सहच्या सुमारास जप्त करण्यात आले. कारवाई करणार्‍या पथकात मंडळ अधिकारी सावदा, मंडळ अधिकारी खिरोदा, तलाठी खिर्डी, तलाठी खिरोदा, तलाठी विवरा, तलाठी वाघोदा, तलाठी निंभोरा, तलाठी सावखेडा, तलाठी गाते, तलाठी कांडवेल, तलाठी बलवाडी, तलाठी ऐनपूर, कोतवाल थेरोळाच्या पथकाने कारवाई केली.