रावेर : जळगाव जिल्हात विधीमंडळ उपसमिती येत असल्याने महसूल विभाग अॅक्शन मोडवर असून सोमवारी एकाच दिवशी तीन अवैध वाळू वाहतूक करणार्या ट्रॅक्टर ट्रॉली रावेर महसूल प्रशासनाने जप्त केल्याने खळबळ उडाली आहे. जळगाव जिल्हात विधीमंडळ उपसमिती येत असून त्या आधीच रावेर महसूल प्रशासन अॅक्शन मोडवर आले आहे. ऐनपूर मंडळ अधिकारी शेलकर , खिरवड व थेरोळा तलाठी कोतवाल यांच्या पथकाने सोमवारी सकाळी विनाप रवाना अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर (एम.एच.28 टी.6635) तर दूसरे (एम.एच. 19 सी.झेड. 6687) पातोंडीनजीक पकडून तहसील कार्यालयात जमा केले तर तिसरे अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर-ट्रॉली खानापूरनजीक पकडण्यात आले मात्र त्याचा क्रमांक देण्यास महसूल प्रशासनाकडून टाळाटाळ करण्यात आली.