महाअधिवेशनाच्या दिवशीच धर्मा पाटलांच्या मुलाची मनसेला सोडचिठ्ठी; राष्ट्रवादीत प्रवेश !

0

मुंबई : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या धर्मा पाटील यांच्या मुलाने आज एकीकडे मनसेचे महाअधिवेशन होत असताना मनसेला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांनी जमिनीच्या मोबदल्यासाठी वारंवार चकरा मारून देखील न्याय मिळाला नसल्याने शेवटी कंटाळून मंत्रालयात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्यानंतर उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठली होती.

नरेंद्र पाटील यांनी २०१९ ची विधानसभा निवडणूक मनसेकडून लढविली होती. मात्र ते पराभूत झाले होते.