चोपडा । येथील भगिनी मंडळाच्या ललित कला केन्द्र या कलासंस्थेत महाराष्ट्र शासनाच्या महत्वपूर्ण ’महाअवयवदान जनजागृती पंधरवाडा अभियान’ अंतर्गत रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ’अवयवदान म्हणजे काय? देहदानाचे महत्व’ यांवर प्राचार्य राजेंद्र महाजन यांनी व्याख्यान देवून वातावरण निर्मिती केली. हे सर्व पुरस्कार रोख स्वरुपात इनरव्हील क्लब ऑफ चोपडाच्यावतीने डिस्ट्रिक्ट एडिटर व नगरसेविका अश्विनी गुजराथी, पं.स.माजी सभापती भारती बोरसे, मृणाल गुजराथी, प्रा.आशिष गुजराथी यांच्या हस्तेप्रदान करण्यात आले. याप्रसंगी संस्थेच्या वयोवृदध संचालिका कुमूदीनी गुजराथी, सचिव उर्मिला गुजराथी, प्रा. आशिष गुजराथी, मुख्याध्यापक एस.डी.चौधरी, मुख्याध्यापक अरुण संदानशीव, इनरव्हील क्लबच्या सदस्या लता छाजेड ,सविता जाधव, अरुणा बाविस्कर, दिपाली बाविस्कर व इतर सदस्या उपस्थित होत्या.
मान्यवरांनी व्यक्त केले मनोगत
याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या सिनेटवर बिनविरोध निवड झालेल्या संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी हिचा सत्कार करण्यात आला. रोटरी क्लब ऑफ जळगांव च्यावतीने पुरस्कृत आदर्श शिक्षक म.गांधी माध्य.विद्यालयाचे जेष्ठ कलाशिक्षक दिनेश बाविस्कर यांचा सत्कार संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी तर रोटरी क्लब ऑफ चोपडाचा ’नेशन बिल्डर अवॉर्ड’ पुरस्कारप्राप्त महिला मंडळ माध्य. विद्यालयाचे उपशिक्षक संजय रघुनाथ बारी यांचा सत्कार सहसचिव अश्विनी प्रसन्नलाल गुजराथी यांनी केला. तसेच याच प्रसंगी श्रीक्षेत्र नागेश्वर नागलवाडी परीसरात विद्यार्थ्यांनी केलेल्या रेखाचित्र व निसर्गचित्रांच्या प्रदर्शंनाचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्षा पूनम गुजराथी यांनी तर स्पंदन भित्तिपत्रकाचे प्रकाशन सत्कारार्थी कलाशिक्षक दिनेश बाविस्कर यानी केले.