जळगाव-जळगाव लोकसभेचे उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर यांच्या प्रचारार्थ आयोजित राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस, रिपाई या महाआघाडीच्या बैठकीवर कॉंग्रेसच्या प्रदेश आणि जिल्हा पदाधिकारी यांनी बहिष्कार टाकला. केमिस्ट भवन येथे आयोजित महाआघाडीच्या बैठकीला कॉंग्रेसचे प्रदेश आणि जिल्हा पदाधिकार्यांनी अनुपस्थिती दिली. रावेर लोकसभा मतदार संघाची जागा कॉंग्रेसला मिळावी या मागणीसाठी प्रदेश आणि जिल्हा पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याचाच एक भाग म्हणून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील आणि प्रवक्ते आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या उपस्थितीत झालेल्या महाआघाडीच्या बैठकीवर कॉंग्रेसने बहिष्कार टाकला.
यात कॉंग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, प्रदेश चिटणीस माजी आमदार शिरीष चौधरी, प्रदेश सचिव डी.जी.पाटील, जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुलोचना वाघ, कॉंग्रेसचे अल्पसंख्याक अध्यक्ष मुन्वर खान, माजी जिल्हाध्यक्ष उदय पाटील, माजी आमदार नीलकंठ फालक, भुसावळचे रवींद्र निकम, निनाजी गायकवाड, परवेझ पठाण, दिलरुबाब तडवी आदी उपस्थित होते.