नवी दिल्ली-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी महाआघाडीवरून विरोधकांवर टीकेची झोड उठविली आहे. महाआघाडी ही जनतेसाठी नाही तर सत्ता मिळविण्यासाठी बनविली जात असल्याचा टोला मोदींनी लगावला आहे.
मोदींनी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चेन्नई, मदुरई, तिरुचिरापल्ली आणि तिरुवल्लूरमधील भारतीय जनता पार्टीच्या बूथ कार्यकर्त्यांशी संवाद साधला, त्यावेळी मोदींनी कॉंग्रेससह विरोधी पक्षांना लक्ष केले.
जैन आयोगाबाबत कॉंग्रेस आणि तेलगु देसम पार्टीचे भांडण कोणीही विसरणार नाही. त्यावेळी कॉंग्रेसने टोकाची भूमिका घेत तेदेपाला संपविण्याची भाषा केली होती.