महाआरोग्य शिबिरातील रुग्णांच्या शस्त्रक्रिया धुळयात होणार

0

नंदुरबार। येथे 30 एप्रिल रोजी सातपुडा महाआरोग्य शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले. या आरोग्य शिबीराचा नंदुरबार जिल्ह्यातील 2 लाख 60 हजार रुग्णानी लाभ घेतला आहे. या शिबिरात ज्या रुग्णाना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अशा रुग्णाच्या शस्त्रक्रिया धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात व धुळे शहरातील राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना कार्यान्वित आहे. अशा रुग्णालयामध्ये करण्यात येणार असल्याची माहिती हिरे वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.एस.एस.गुप्ता यांनी दिली आहे.

अधिकार्‍यांची उपस्थिती
या संदर्भात हिरे वैद्यकीय महाविद्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून या बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव, स्वयी सहाय्यक रामेश्वर नाईक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे सहसंचालक प्रसिध्द नेत्र रोगतंज्ञ डॉ.तात्याराव लहाने, डॉ.ललीत पाटील, डॉ.विपुल बाफना, डॉ.माधुरी बाफना, डॉ.हेमंत चौधरी, डॉ.राहुल येतोडकर, डॉ.लोकेश पाटील, डॉ.गणेश चौधरी, डॉ.आर्शद कादरी, डॉ.जितेंद्र ठाकूर, डॉ.पंकज देवरे, डॉ.राजेश अग्रवाल, राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे जिल्हा प्रमुख समीर खान, निरीक्षक सुभाष मोरे, आदि उपस्थित होते.

प्रथम टप्प्यात 1 हजार 339 शस्त्रक्रियांचे नियोजन
नंदुरबार येथे 30 एप्रिल,2017 रोजी महाआरोग्य शिबीराचे आयेाजन करण्यात आले होते. सदर शिबिरात जवळपास 2 लाख 60 हजार रुग्णांची आरोग्य तपासणी तसेच तपासणी करण्यात आली आहे. त्यामध्ये तपासणी करतांना जवळपास 60 ते 70 हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्याची आवश्यकता आहे. प्रथम टप्प्यात 1 हजार 339 शस्त्रक्रियांचे नियोजन करण्यात येणार आहे, नंदुरबार येथील महाआरोग्य शिबीरात ज्या रुग्णांचे तपासणीअंती शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे.अशा रुग्णांना खाजगी दवाखाने ज्याठिकाणी राजीव गांधी जीवनदायी योजना कार्यान्वीत आहे अशा ठिकाणी शस्त्रक्रियेसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व खाजगी वैद्यकीय व्यवसायीकांनी त्यांच्या रुग्णालयाची रचना,एकूण खाटा,ऑपरेशन थिएटर,एमआरआय सुविधा,टु-डी- इको,सी.टी.स्कॅन सुविधा व इतर सुविधासंह संपूर्ण तपशिल हा त्वरीत सादर करावा.