नंदुरबार । नंदुरबार येथे झालेल्या सातपुडा महाआरोग्य शिबिरातील रुग्णांवर धुळे येथील रुग्णालयांमध्ये शस्त्रक्रिया होत आहेत, डॉ. एस. एस. गुप्ता, अधिष्ठाता, श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, धुळे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे.सातपुडा महाआरोग्य शिबिरातील रुग्णांच्या शस्त्रक्रिया या धुळे येथील राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना ज्या शासकीय, खासगी रुग्णालयात कार्यान्वित आहेत, तेथे संबंधित रुग्णांवर शस्त्रक्रिया व उपचार सुरू करण्यात आलेले आहेत.या उपक्रमासाठी श्री भाऊसाहेब हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, धुळेचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. गुप्ता, डॉ. अजित पाठक, विभागप्रमुख, न्यायवैद्यकशास्त्र (वैद्यकीय अधीक्षक, सर्वोपचार रुग्णालय, धुळे) तथा नोडल ऑफिसर, नंदुरबार महाआरोग्य शिबिर, डॉ. आशिष पाटील, डॉ. राजेश अग्रवाल, डॉ. कुणाल मेहता, डॉ. पंकज देवरे, डॉ. जितेंद्र ठाकूर, डॉ. विपुल बाफना, डॉ. ललित पाटील सहकार्य करीत आहेत.