महाआरोग्य शिबीरास रूग्णांचा उर्त्स्फुत प्रतिसाद

0

पाचोरा । जलसंपदा मंत्री ना. गिरीश महाजन फाऊंडेशन आयोजित एकदिवसीय मोफत महाअरोग्य शिबीरास सुरूवात करण्यात आली आहे. सकाळपासून गरजू रूग्णांनी तपासणीसाठी हजर झाले आहे. भडगाव रोड वरील निर्मल रेसिडन्सी समोर वीस एकरच्या जागेत उभालेल्या भव्य मंडपात सर्वपक्षिय पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती आहे. महाआरोग्य शिबीरात उपचारासाठी आत्तापर्यंत 75 हजाराहून अधिक रूग्णांनी विविध आजारांच्या उपचारासाठी नोंदणी करण्यात आली आहे. आज होणार्‍या शिबीरात अंदाजे दीड लाख रूग्ण हजेरी लावण्याची शक्यता दिसून येत आहे. आयोजित महाआरोग्य शिबीरात फक्त तपासणी होणार नसून लहान आरांवरील निदानासाठी जळगाव येथे पाठविण्यात येणार आहे तर मोठ्या आजारांवरील निदानासाठी मुंबई, पुणे, नाशिक सारख्या शहरात पाठविण्यात येणार आहे. आज रविवारची सुटी असूनही पाचोरा व भडगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका, आरोग्य सेवक, कृषी सेवक, ग्रामसेवक, सर्व अधिकारी व जि.प.चे सर्व प्राथमिक.व माध्य.शिक्षक रुग्ण नोंदणीची मोफत सेवा बजावत आहे.

विविध विभाग याप्रमाणे
नेत्र रोग तपासणी, मेंदूरोग तपासणी, मनोविकार तपासणी, अनुवंशिक विकार तपासणी, दंत तपासणी, जलरल मेडीसिन तपासणी, श्‍वसन विकार तपासणी, हृदय रोग तपासणी, लठ्ठपण तपासणी, हाडांची तपासणी, स्त्री रोग तपासणी, बालरोग तपासणी, प्लास्टिक सर्जरी तपासणी, कान, नाक व घसा तपासणी, कर्करोग तपासणी, जनरल सर्जरी तपासणी, त्वचारोग तपासणी, मूत्ररोग तपासणी यांच्यासह (आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी व योग) आदी विभागांची नियोजन करण्यात आले आहे.