मुंबई : PUBG खेळण्यासाठी पालकांनी महागडा स्मार्टफोन विकत घेऊन न दिल्यामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील कुर्ला परिसरात राहणाऱ्या एका तरुणाने पालकांकडे PUBG खेळण्यासाठी महागड्या स्मार्टफोनचा हट्ट धरला होता. मात्र 37 हजारांचा स्मार्टफोन घेणं पालकांना शक्य नसल्याने त्यांनी मुलाला फोन घेऊन देण्यास नकार दिला. आई-वडिलांनी फोन न दिल्यामुळे नाराज झालेल्या तरुणाने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं. तरुणाने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.