जळगाव : शहरातील भूषण कॉलनी परीसरातून विद्यार्थ्यांचे महागडे दोन मोबाईल चोरट्याने लांबवले. याबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
रामानंद नगर पोलिसात गुन्हा
तेजस सुनील विखणकर (19, खिर्डी, ता.रावेर, ह.मु. शांती सदन, भूषण कॉलनी) हा शिक्षणासाठी भाड्याच्या खोलीत राहतो. गुरूवार, 16 जून रोजी सकाळी 7 ते 9.30 वाजेच्या सुमारास त्याच्या खोलीतून अज्ञात चोरट्याने 17 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल चोरून नेले. तेजसला हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याने परिसरात शोधाशोध केली परंतू मोबाईल कुठेही आढळून आला नाही. दुपारी चार वाजता त्याने रामानंदनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.