Two in the net while removing the two-wheeler from the Deepnagar project भुसावळ : तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या 500 मेगावॅट प्रकल्पाच्या बल्कर गेटजवळ दुचाकी चोरताना व 10 हजार 800 रुपये किंमतीचे बेसजॅक चोरताना तीन संशयीत आढळले मात्र हा प्रकार सुरक्षा रक्षकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दुचाकी सोडून पळ काढला. या प्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल केल्यानंतर दोन संशयीतांना अटक करण्यात यश आले.
भुसावळ तालुका पोलिसात त्रिकूटाविरोधात गुन्हा
सुरक्षा पर्यवेक्षक अरुण सुभाष पाटील (32, दीपनगर कॉलनी) रविवार, 6 रोजी सायंकाळी पावणेसहा वाजता संशयीत रोशन सुरेश बार्हे, प्रशिक सुनील जोहरे (दोन्ही रा.पिंपळगाव खुर्द) व दीपक उर्फ गोलू सुरवाडे (निंभोरा) यांनी प्रकल्पातून दुचाकी (एम.एच.19 डी.जे.6019) तसेच 10 हजार 800 रुपये किंमतीचे बेसजॅक व लोखंडी यु जॅक लांबवले मात्र चोरी होत असल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर सुरक्षा रक्षकांनी पाठलाग केल्यानंतर चोरटे पसार झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर रोशन व प्रशिकला अटक करण्यात आली. तपास एएसआय श्यामकुमार मोरे करीत आहेत.