महागाईच्या विरोधात पाचोऱ्यात बंदचे आवाहन

0

पाचोरा – केंद्र व राज्य सरकारच्या साडेचार वर्षांच्या काळात दामदुपटीने पेट्रोल व डिझेलचे वाढते भाव शेतकऱ्यांची कर्जमाफीची घोषणा करून वर्षे लोटले तरी अद्याप लाभ मिळत नाही, बोंड अळीचे पैसे शेतकऱ्यांचे पैसे खात्यात जमा होत नाही, रायफेल भ्रष्टाचार राज्यातील ६५० उद्योगपती शेतकऱ्यांना ७८ हजार कोटी रुपये कर्ज‌‌‌ माफी दिली मात्र सर्व सामान्य शेतकऱ्यांना कर्जमाफी पासुन वंचित ठेवले, व महागाई वाढ अशा विविध कारणांमुळे केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यासाठी पाचोरा १० रोजी राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रिय कॉंग्रेस व समविचारी पक्षातर्फे पाचोरा बंदचे आवाहन पत्रकार परिषदेचे आयोजन करुन करण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी माजी आ.दिलीप वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रवक्ते खलील देशमुख, विधानसभाक्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील माजी सभापती शेख इस्माईल शेख फकिरा, माजी तालुकाध्यक्ष किरण पाटील, रणजीत पाटील, नंदकुमार सोनार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहराध्यक्ष सतिष चौधरी, काँग्रेसचे शहराध्यक्ष मुक्तार शाह, डॉ.फिरोज शेख, इरफान मनियार उपस्थित होते. पाचोरा बंदसाठी व्यापारी बांधवांनी सहकार्य करावे व सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमावे, असे आवाहन कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील व राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजय पाटील यांनी केले आहे.