पुणे । पट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या भाववाढीच्या निषेधार्थ शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अंतर्गत पुणे कॅन्टॉन्मेंट विधानसभा मतदार संघाच्या वतीने कोहिनुर हॉटेल चौकात शुक्रवारी आंदोलन करण्यात आले. केंद्र व राज्यसरकारच्या विरोधात जोरदार निदर्शने करण्यात आली.
देशात अच्छे दिन आणण्यासाठी भाजपला निवडून द्या, असे म्हणणारे नरेंद्र मोदी आज वाढलेल्या भाववाढीच्या संदंर्भात मौन पाळून आहेत. ऐन दसर्याच्या आणि दिवाळीच्या सणात रेशनिंगमार्फत मिळणारी साखर बंद केली. घरगुती गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढले अशा परिस्थितीत सामान्य जनतेने करायचे काय? मोदींनी भाववाढ करून जनतेला दिवाळीची भेट दिली आहे, असे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी यावेळी सांगितले. माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अॅड. अभय छाजेड, अरविंद शिंदे, नगरसेवक अजित दरेकर, अविनाश बागवे, रफिक शेख आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सामील झाले होते.