जैताणे । श्री संत सावता माळी युवक संघातर्फे दिला जाणारा राज्यस्तरीय संत सावता भूषण पुरस्कार 2017 प्रवीण महाजन व ईश्वर वारुळे यांना जाहीर झाला आहे. सचिन गुलदगड संस्थापित श्री संत सावता माळी युवक संघ जि अहमदनगर महाराष्ट्र राज्य यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या व्यक्तींकडून प्रस्ताव मागविले होते. कोठली ता. शहादा ह. मु. कोथरूड पुणे येथील वाचन चळवळीचे प्रणेते,जिल्हा परिषदेत नोकरीस असलेले प्रवीण सुरेश महाजन व लोणखेडा ता शहादा येथील ईश्वर वारुळे यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.
12 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे पुरस्काराचे वितरण
प्रवीण महाजन यांनी शैक्षणिक व विद्यार्थीमित्र या क्षेत्रात तर ईश्वर वारुळे यांना उत्कृष्ट समाज संघटन या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जाणार आहे. पुरस्कार वितरण सोहळा दि 12 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथे संत सावता माळी यांचे वंशज रमेश महाराज वसेकर, आ. योगेश टिळेकर,जयकुमार गोरे, आ. वसंत गीते व समाजातील श्रेष्ठ व्यक्तींच्या हस्ते पार पडणार आहे. प्रवीण महाजन यांना याच वर्षी राष्ट्रपती भावणातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय विश्वप्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे माळी समाजातील सर्व सामाजिक संघटनांनी पुरस्कार मिळाल्याबद्दल दोघींचे अभिनंदन केले आहे.