महाडमध्ये तरूण बुडाला

0

महाड : महाड येथील चवदार तळ्यात पोहण्यासाठी गेलेल्या अठरा वर्षीय तरूणाचा तळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना शनिवारी घटली. तरूणाचा मृतदेह सायंकाळी 4 वाजता तळ्याबाहेर काढण्यात आला. महाड तालुक्यातील राजेवाडी येथील राहील ईस्माईल जोगीलकर असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. राहील हा महाड तालुक्यातील दाभोळ येथील मदरसामध्ये धार्मिक शिक्षण घेत होता. दोन दिवसासाठी सुट्टीत तो आपल्या राजेवाडी या गावी आला होता.आज दुपारी तो आपल्या मित्रांसोबत चवदार तळ्यात पोहण्यासाठी उतरला असता तो बुडू लागला. त्याच्या मित्रांनी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु खोल पाण्यात तो बुडाला. त्यानंतर घाबरलेल्या त्याच्या मित्रांनी तिथून पळ काढला. या परिसरातील नागरिकांनी तळ्यात तरुण बुडाल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर नगरपरिषद कर्मचारी तसेच दासगाव व नडगाव येथील भोई समाज बांधवांनी होडीद्वारे तसेच पाण्याखाली जाऊन बुडालेल्या तरुणाचा मृतदेह बाहेर काढला.