चाळीसगाव : समाजकल्याण आयुक्तालय पुणे यांच्या निर्देशानुसार सहाय्यक आयुक्त समाजकल्याण, जळगाव आपली समन्वय समितीमार्फत 4 रोजी बी.पी.आर्टस्, एस.एम.ए.सायन्स आणि के.के.सी.कॉमर्स कॉलेज, के.आर.कोतकर ज्युनियर कॉलेज चाळीसगाव येथे ‘महाडीबीटी’ शिष्यवृत्तीबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मंचावर शिक्षणाधिकारी सचिन परदेशी, प्राचार्य तथा तालुका समन्वय समिती अध्यक्ष डॉ.पी.एस.बाविस्कर, समाजकल्याण तालुका समन्वयक अनिल पगारे उपस्थित होते.
यशस्वितेसाठी यांनी केले प्रयत्न
महाडीबीटीसंदर्भात सर्व मुख्याध्यापक व लिपीक यांनी स्मार्ट बनून काम करायला हवे. यामध्ये एकमेकांचा ग्रुप बनवून यातील अडचणींवर मात करायला हवी. पोर्टल जरी नवीन असले तरी भविष्यात आपल्याला कामाबाबत मदत होईल. याप्रसंगी प्राचार्य डॉ.बी.एस.बाविस्कर म्हणाले की, महाडीबीटीचे काम इमानदारीने करुन विद्यार्थ्याला पोर्टलबाबत मार्गदर्शन करावे. तसेच प्रत्येक विद्यालय, महाविद्यालयात एक समिती बनवून शिष्यवृत्तीसंदर्भात विद्यार्थ्यांच्या नोंदणी अर्ज याबाबत त्यांच्यात जागृती निर्माण करा असे सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पगारे यांनी महाडीबीटी संदर्भात विद्यार्थ्यांनी नोंदणी अर्ज कसे करावेत याबद्दल माहिती देऊन स्वाधार योजनेचीदेखील माहिती दिली. कार्यक्रमास मोठ्यासंख्येने तालुक्यातील मुख्याध्यापक, लिपीक, विद्यार्थी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी प्रा.नन्नवरे, सचिन ठाकूर, प्रा.सदावर्ते यांनी परिश्रम घेतले.