महात्मा गांधींच्या दुर्मीळ पोस्टल स्टॅम्पला मिळाले तब्बल 4 कोटी

0

नवी दिल्ली । प्रत्येकाचा काहीना काही छंद असतो, काहींना जुनी नाणी किंवा नोटा जमविण्याचा छंद असतो तर काहींना पोस्टल स्टँम्प जमवण्याचा छंद असतो. अशा प्रकारचा छंदामुळे पैसे वाया जात असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र, याच एका छंदामुळे अनेकांना फायदाही झाल्याच समोर आले आहे. असाच एक प्रकार आता पून्हा एकदा समोर आला आहे. कारण, महात्मा गांधी यांचा दुर्मिळ पोस्टल स्टँम्प चक्क कोट्यावधी रुपयांना विकला गेला आहे.

इंग्लंडमधल्या एका लिलावगृहात महात्मा गांधींच्या दुर्मिळ पोस्टाच्या स्टँम्प्सना 5 लाख पौडांची (सुमारे सव्वाचार कोटी रूपये) बोली लागली आहे. गांधीजींचे छायाचित्र असलेले भारतीय पोस्ट तिकीट ब्रिटेनमध्ये 4 कोटी रुपयांना विकले गेले असून हे पोस्ट तिकीट 1948 साली छापण्यात आले होते आणि त्यावेळी त्याची किंमत प्रत्येकी 10 रुपये इतकी होती.

हे पोस्ट स्टॅम्प विकणार्‍या व्यक्तीचे म्हणणे आहे की, आतापर्यंत पोस्ट स्टॅम्पला मिळालेली ही सर्वात मोठी किंमत आहे. हे 4 पोस्ट स्टॅम्प एका ऑस्ट्रेलियन कलेक्टरला विकण्यात आले आहेत. 1948 मधील गांधीजींचे छायाचित्र असलेल्या जांबळ्या-तपकीरी रंगाचे 10 रुपयांचे आणि लेक सर्व्हिसवाले फक्त 13 पोस्ट स्टॅम्प सर्कुलेशनमध्ये आहेत. त्याआधी याच वर्षी मार्चमध्ये चार आण्याचे शिक्के 9,106,434.63 रुपयांना विकले गेले होते. दुर्मिळ भारतीय स्टँप्सना जगभर मागणी वाढली आहे.

हे स्टँप्स आपल्याही संग्रही असावेत अशी जगभरात अनेक संग्राहकांची इच्छा आहे. या दुर्मिळ भारतीय वस्तूंची खरेदी करणारे आंतरराष्ट्रीय ग्राहक वाढले आहेत. त्यामुळे या बाजारपेठेला मोठी मागणी असल्याचं तज्ञांचे मतं आहे.