महात्मा गांधींविरोधात पोस्ट केल्याने भाजपच्या मीडिया प्रमुखाचे निलंबन

0

भोपाळ: महात्मा गांधी यांच्या विरोधात पोस्ट टाकणाऱ्या भाजप पक्षाचे मध्यप्रदेश मधील मिडिया संपर्क प्रमुख अनिल सौमित्र यांचे निलंबन भाजपने केले आहे. भोपाळमधील भाजपच्या उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी महात्मा गांधी यांच्या मारेकऱ्याला थोर देशभक्त म्हटले होते होते, तेव्हा पासून भाजपचे काही नेते यांनी महात्मा गांधी यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करत टीका टिप्पणी केली होती, यावरून देशाचे राजकारण ढवळून निघाले आहे.

अनिल सौमित्र यांनी ‘महात्मा गांधी हे पाकिस्तानचे राष्ट्रपिता होते’ तसेच त्यांच्या सारखे भारतात अनेक पुत्र जन्माला आले, त्यात काही चांगले निघाले, बाकीचे नालायक निघाले. या प्रकारची आक्षेपार्ह पोस्ट त्यांनी केली होती. त्या वर भाजप पक्षाने तातडीने दखल घेत त्याचं निलंबन केले आहे.

साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना भाजप पक्षाने झापले असून, पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषण मधून साध्वीला कधी माफ करणार नसल्याचे म्हटले आहे. अमित शहा यांनी त्या वक्तव्याशी भाजपाचा काही संबध नसल्याचे म्हटले आहे.