महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी बोरकर

0

सासवड । आंबोडी येथील महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपट उर्फ रोहिदास आबा बोरकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. येथील गावची नुकतीच ग्रामसभा घेण्यात आली. यामध्ये त्यांची निवड केल्याची माहिती ग्रामसेविका सुनिता चवधर यांनी दिली. पंचायत समितीचे सदस्य रमेश जाधव यांनी या निवडीबद्दल पोपट बोरकर यांचे अभिनंदन केले. यावेळी सरपंच अंजली बोरकर, उपसरपंच चंद्रकांत बोरकर, ग्रामपंचायत सदस्य अनिल बोरकर, नंदिनी बोरकर, प्रतिभा बोरकर, सुरेखा बोरकर, सामाजिक कार्यकर्ते अजित बोरकर, भगवान बोराकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.