महात्मा गांधी विद्यालयातील 39 विद्यार्थी गुणवत्ता यादीत

0

शाळेतून करण्यात आले विद्यार्थ्यांचे कौतुक

राजगुरुनगर- येथील महात्मा गांधी विद्यालयातील 39 विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत शहरी विभागाच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून दैदीप्यमान यश संपादित केले आहे, अशी माहिती प्राचार्य सुनील जाधव यांनी दिली. इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 27 विद्यार्थी तसेच इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत 12 विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविलेले आहे.

यशस्वी विद्यार्थ्यांचे नाव, कंसात गुण पुढीलप्रमाणे-

रेणुका धुमाळ (270), वैष्णवी धुमाळ (264), मृगजा मलघे (256), समृद्धी ठाकूर (254), दुर्वा टाकळकर (250), युवराज ठाकूर (248), मानसी साबळे (242), मृगेंद्र मलघे (242), तनिष्क खैरे (242), सार्थक धुमाळ (236), शुभम गोपाळे (236), चिन्मय जगताप (234), आकांक्षा डूबे (232), आदित्य मोटे (228), रुचिता पंडित (228), भक्ती दरवडे (224), श्रेया भूमकर (224), कार्तिक कदम (208), सागर हिंगे (206), सिद्धेश ढवळे (206), तेजस खणकर (206), दिपाली राठोड (202), सानिका पाटील (202), स्वामिनी डावरे (202), श्‍वेता गाडे (202), तन्वी देशमुख (202), प्रसाद कान्हुरकर (196). इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे नाव, कंसात गुण पुढीलप्रमाणे : हुमेरा सय्यद (250), विभावरी बारणे (250), मनिष बाणखेले (242), श्रुती नाईक (240), यश राउत (238), जुई नाईकरे (230), सिद्धेश दिसले (230), नरेंद्र गडदे (224), निधी बारणे (222), मिताली येवले (220), सार्थक घोडेकर (218), वैष्णवी पोखरकर(214).

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विभागप्रमुख शैलेंद्र गावडे यांनी व पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विभागप्रमुख तुळशीराम घोलप यांनी काम पहिले. रेश्मा साळे, अर्चना गोडसे, संध्या कातळे, नयना लोखंडे, सविता गुरव, प्रतिपदा ठुबे, सुरेखा होले, कविता जगदाळे, मंगल गावडे, अरुणा सांडभोर, उर्मिला मुळूक, शितल कड, मृणाल कुलकर्णी, स्वाती टाकळकर, सारिका सांडभोर, संगिता शेळके या अध्यापकांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. संस्थेचे अध्यक्ष हरिभाऊ सांडभोर, सचिव गणेश जोशी, शाला समिती अध्यक्ष प्रा. पांडुरंग होले व संस्था संचालकांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले.