महात्मा फुलेंच्या पुतळ्याचा चबुतऱ्याची नासधूस

0

कल्याण : कल्याण पश्चिमकडील स्टेशन परिसरात महात्मा फुले चौकात महात्मा फुले यांचा अर्धपुतळा आहे. या पुतळयाचा चबुतऱ्यांची नासधूस करणण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला असून याबाबत संभाजी ब्रिगेडने आंदोनात्मक पवित्रा घेतला असून संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष अमित केरकर यांनी महापालिका आयुक्त पी. वेलारासू यांना पत्र दिले असून येत्या 24 तासात जर या चबूतऱ्याची दुरुस्ती केली नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला आहे.

कल्याण पश्चिमेकडील स्टेशन परिसरातील महात्मा फुले चौक येथे महात्मा फुले यांचा अर्धपुतळा बसवण्यात आला आहे .मात्र या पुतळ्य़ाच्या शेजारी गर्दुल्ले, नशा करणारे आणि भिका:याचा वेढा असतो तसेच हे भिकारी याच ठिकाणी जाळ करुन चुलीवर अन्नपदार्थ शिजवतात ,रस्त्याच्या कडेला कपडे धूऊन ते पुतळ्या शेजारीच वाळण्यास टाकतात.मात्र महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याने या ठिकाणी अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे .त्यातच या पुतळ्याच्या चबुतऱ्याची नासधूस करण्यात आल्याचे दिसून आले आहे .याबाबत संभाजी ब्रिगेड ने प्रशासनाचे लक्ष वेधले असून महापालिका प्रशासन विटबंना होण्याची वाट पाहत आहे का असा संतप्त सवाल ब्रिगेडच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे. स्टेशन परिसरातील गदरुले, भिकारी, नशाबाजांवर पोलिस कारवाई करीत नाहीत याविषयी ब्रिगेडने आश्चर्य व्यक्त केले आहे.तसेच येत्या 24 तासात दुरुस्ती केली नाही तर प्रशासनाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिले आहे