वरणगावात माळी समाजातर्फे पोलिस उपअधीक्षकांना निवेदन
भुसावळ- थोर समाजसुधारक महात्मा ज्योतीबा फुले यांच्याबद्दल सोशल मिडीयावर कपील सरोदे या समाजकंटकाने आक्षेपार्ह पोस्ट टाकून माळी समाजासह बहुजन नागरीकांच्या भावना दुखावल्या आहे. कपिल सरोदेवर गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी समस्त माळी समाजातर्फे मंगळवार, 4 रोजी वरणगाव पोलिस ठाण्यात डीवायएसपी सुभाष नेवे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, 2 डिसेंबर रोजी कपिल सरोदे या समाजकंटकाने स्वत:च्या सोशल मिडीयाच्या फेसबुक अकाऊंटवरुन थोर समाजसुधारक बहुजनांचे महानायक जगात शिवजयंती साजरी करणारे, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरुवर्य राष्ट्रपिता महात्मा फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केली. ही आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने माळी समाजासह बहुजन समाजातील नागरीकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यांच्यावर सोशलमिडीया अॅक्टनुसार त्वरीत गुन्हा दाखल करुन कारवाई करावी, अशी मागणी माळी समाजातर्फे निवेदनाद्वारे डीवायएसपी सुभाष नेवे यांना करण्यात आली आहे.
यांची होती उपस्थिती
सहाय्यक पोलिस निरीक्षक सारीका कोडापे, गोपनीय शाखेचे राहुल येवले उपस्थित होते. निवेदन देतेवेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष संतोष माळी, समाजाचे अध्यक्ष सोपान माळी, तालुकाध्यक्ष तथा नगरसेवक बबलू माळी, युवा संघटनेचे अध्यक्ष दीपक माळी, उपाध्यक्ष बाळा माळी, किरण माळी, पंच संजय माळी, भगवान माळी, बापू माळी, गंभीर माळी, विकास माळी, विलास माळी, अमोल माळी, अतुल माळी, विजय माळी, योगेश माळी, विनोद माळी, अविनाश माळी, अनंत माळी, विनायक माळी, राहुल माळी, मनोज माळी, ज्ञानेश्वर माळी, चेतन माळी, कास्ट्राईब संघटनेचे विजय सोनवणे, राहुल माळी, जितेंद्र माळी, रा.ग.माळी, प्रताप माळी, उमेश माळी, गणेश माळी उपस्थित होते.