महात्मा फुले पतसंस्थेच्या सभासदांना 5 टक्के लाभांश !

0

23 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर

शिरपूर । शहरातील वरवाडे रेथील महात्मा फुले नागरी सहकारी पतपेढीची 23 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक चेअरमन सुरेश भगवान बागुल व चेअरमन राजेश बागुल रांच्रा मार्गदर्शनाखाली संपन्न झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी शिरपूर मर्चंट बँकेचे संचालक रामचंद्र ठाकरे होते. सभेत सुरुवातीस दिवंगत मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्रात आली. नवनिर्वाचित नगरसेविका आशा बागुल व शिरपूर मर्चंट बँकेचे नवनिर्वाचित संचालक रामचंद्र ठाकरे, व्यापारी नारारण माळी व शिक्षण मंडळ सदस्य देविदास माळी रांचा सत्कार राजेश बागुल यांच्या हस्ते करण्यात आला. सभेत सभासदांना पाच टक्के लाभांश देण्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी दहावी व बारावी मध्ये 75 टक्क्रांपेक्षा अधिक गुण मिळविणार्‍या गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला.

सभासदांच्या पाल्यांचा गुणगौरव
सभेस चेअरमन राजेश सुरेश बागुल, व्हाईस चेअरमन रविंद्र माळी, संचालक किशोर सोनवणे, सुमती माळी, भिकन लोहार, मनोज जैन, काशिनाथ धनगर, जयवंत माळी, गोकुळ थोरात, विद्या माळी, डॉ.दिपक बागुल, मधुकर पाटील, अनिल माळी आदी उपस्थित होते. सभेसाठी पतसंस्थेचे व्यवस्थापक विजर पवार, कर्मचारी अभिमन माळी, सोनाली माळी, सुहास पवार, वसंत माळी, कल्पनाबाई माळी, रंजना माळी, सुनिल माळी, जितेंद्र आसापुरे, संजर माळी आदींनी परीश्रम घेतले.