महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळात साडेसहा कोटींचा अपहार : संशयीताला पोलिस कोठडी

भुसावळ : महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या योजनेत साडे सहा कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी जळगाव आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल आहे. या प्रकरणी गुरुवार, 24 जून रोजी मुख्य एजंट संदीप प्रभाकर सावळे (36, रा.भुसावळ) यास अटक करण्यात आल्यानंतर न्यायालयाने 27 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यास रविवारी न्यायालयात हजर केले असता पुन्हा दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. दरम्यान, शुक्रवारी जळगाव गुन्हे शाखेच्या पथकाने साबळे याच्या गणेश नगरातील घराची झडती घेतली मात्र त्यात काहीही आढळले नव्हते. संशयीत आरोपीकडे एक कोटी तीन लाखांच्या रकमेबाबत विचारपूस सुरू असल्याची तपासाधिकारी निरीक्षक बळीराम हिरे यांनी दिली.