अतिक्रमण निर्मुलन कारवाईच्यावेळी वाद ;विक्रेत्यांचे साहित्य जप्त
जळगाव– शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या महात्मा फुले मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे.त्यामुळे पायी चालणे देखील अवघड होत आहे.दिवसेंदिवस अतिक्रमण वाढत असल्याची तक्रार मनपा प्रशासनाकडे आली होती.त्यानुसार गुरुवारी सकाळी अतिक्रमण निर्मुलन मोहिम राबविण्यात आली.कारवाई करताना मनपाचे पथक आणि विक्रेत्यांमध्ये वाद झाल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता.
महात्मा फुले मार्केटमधील अतिक्रमण काढण्यासाठी मनपा अतिक्रमण निर्मुलन विभागाचे अधिक्षक एच.एम.खान यांच्यासह पथक गेले होते.पथक पोहचताच विक्रेत्यांची चांगलीच धावपळ उडाली होती.दरम्यान,कारवाई करताना विक्रेत्यांनी मनपाच्या पथकासोबत वाद घातला.त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.पथकाने कारवाई करुन सहा विक्रेत्यांचे साहित्य जप्त केले.मनपाने केलेल्या कारवाईमुळे महात्मा फुले मार्केटने मोकळा श्वास घेतला.