महात्मा फुले यांच्या जयंतीनिमित्त उद्या व्याख्यान

0

नंदुरबार । महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्ताने 9 एप्रिल रोजी माळीवाडा परिसरात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. नागपूर येथील अविनाश ठाकरे हे महात्मा ज्योतीबा फुले व व्यवसाय मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान देतील. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे म्हणून खा.डॉ.हिना गावीत, नगराध्यक्षा रत्नाताई रघुवंशी, आ.डॉ.विजयकुमार गावीत, आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.शिरीष चौधरी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रशांत वाघुंडे, उपनगराध्यक्ष राजेंद्र माळी, आरोग्य सभापती शकुंतला माळी, नगरसेविका कविता माळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे. या मान्यवरांच्या उपस्थितीत महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात येणार आहे. समाज बांधवांनी कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन माळी समाज पंच मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.