हडपसर । येथील तुळजा पार्क सहकारी गृहरचना संस्था मर्यादितच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 10वी, 12वी, पदवीधर, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्या उज्ज्वला टिळेकर, प्रशांत तुपे, संदीप तुपे, के. पवार, हरिभाऊ काळे, तसेच संचालक मंडळ, सोसायटीचे सर्व सभासद, महिला उपस्थित होते. शालोपयोगी वस्तू तसेच स्मृतिचिन्ह भेट देऊन मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.