पुणे । पुणे महापालिका क्षेत्रातील पथारी व्यावसायिकांसाठी निश्चित केलेल्या फेरीवाला धोरणाबाबत नुकतीच महापालिकेत बैठक पार पडली. या बैठकीत पथारी व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी शहरातील 330 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत त्या ठिकाणी 10 हजार पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन करण्यात येणार असून पालिकेने त्यासाठी दर देखील निश्चित करण्यात आले आहेत.
केंद्र शासनाच्या आदेशानुसार महापालिकेने 2014 पासून फेरीवाला धोरणांची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.
त्यानुसार महापालिकेने यापूर्वी 21 हजार पथारी व्यावसायिकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करून त्यांना ओळखपत्र दिलेे आहे. आता या पथारी व्यावसायिकांचे पुनर्वसन महापालिकेतर्फे करण्यात येणार आहे. त्यासाठी 330 जागांची निश्चिती करण्यात आली आहे. या जागेवर 10 हजार पथारी व्यवसायिकांचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. या व्यावसायिकांसाठी प्रति दिन झोननुसार 25 रुपये ते 200 रुपयांपर्यंतचा दर निश्चित करण्यात आला आहेत. या पुनर्वसनानंतर महापालिकेला तब्बल 100 कोटींचा महसूल मिळणार आहे.