संघर्ष समितीचे विविध मागण्यांसाठी महापालिका आयुक्तांना साकडे; कारवाई करण्याचे आश्वासन
नेरुळ । नागरिकांचे आरोग्य बिघडविण्यास कारणीभूत ठरत असलेले महापालिका क्षेत्रातील अनधिकृत मोबाईल टॉवर काढून टाकण्याच्या मागणीसह अन्य पाच मागण्यांचे निवेदन पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांना संघर्ष समितीच्या वतीने देण्यात आले. यावेळी त्यांना मोबाईल टॉवरच्याबाबतीत उच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून त्यानुसार कारवाई केली जाईल. बिल्डींगचेस्ट्रक्टर ऑडिट आहे की नाही ते तपासले जाईल. पालिकेचा कर वाढविण्यासाठी त्यातून प्रयत्न केला जाईल असे सांगण्यात आले. २५० कोटी रूपयांची योजना अंतिम टप्प्यात आहे. लवकरच तीची अंमलबजावणी करून ती राबविल्यास पाणी टंचाईचा प्रश्न नियंत्रणात येईल असे सांगितले.
वडाळे तलाव, भाजी मार्केट समोरील तलावांचे सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव तयार
वडाळे तलाव आणि भाजी मार्केट समोरील तलावांचे सौंदर्यीकरण करणार आहोत. त्याचा प्रस्ताव तयार झाला आहे. बोटींग सुरू करण्याचा प्रयत्न राहिल. तलावाकाठची अतिक्रमणे हटविली जातील. उत्तरकार्य विधी घाटावरील अस्वच्छता दूर केली जाईल. ते काम लवकरच प्रशासकीय पातळीवर सुरू होईल. तलावातील जलप्रदुषणावर तोडगा काढण्यासाठी लवकरच बैठक बोलाविली जाईल. त्यातून मार्ग काढण्यासाठी निविदा मागविली जाईल. ठेकेदाराची नियुक्ती करून तलाव स्वच्छ करण्याचा प्रयत्न राहिल.अनधिकृत दुकानांचे गाळे पाडल्यानंतर काहींनी पुन्हा बस्तान बसविले आहे. त्यांचे फार थोडे दिवस आहेत. वेळ मिळाल्यावर पुन्हा ते नेस्तनाबूत केले जातील. तसेच राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्यांनाही याबाबत सुचना देण्यात येतील.
किरणोत्सामुळे रोगाचा प्रादुर्भाव
कोणत्याही गृहसंकुलाचे स्ट्रक्चर ऑडिट न करता अथवा महापालिकेची कोणतीही रीतसर परवानगी न घेता पनवेलसह सर्वंच शहरांमध्ये बेकायदेशिर मोबाईल टॉवर मोठ्या प्रमाणात उभारले गेले आहेत. त्यातून निर्माण होणार्या घातक किरणोत्सामुळे महाभयंकर रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने नागरिकांच्या आरोग्यास मारक ठरणारे मोबाईल टॉवरवर कायदेशिर, दंडात्मक कारवाई करून ते काढून टाकण्यात यावेत, अशी मागणी विजय काळे यांनी आयुक्तांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.