जळगाव । शासन परिपत्रक क्र. महालो-1009/प्र.क्र. 78/18-अ दिनांक 25 ऑगस्ट 2009 शासन निर्णय नुसार जळगाव शहर महानगरपालिकेसंबंधी लोकशाही दिन आयोजित करण्यात येतो. ऑगस्ट महिन्यात 7/08/2017 रोजी पहिला सोमवार येत असून त्या तारखेला रक्षा बंधनाची सुटी असल्याने सदरचा लोकशाही दिन सोमवार ऐवजी मंगळवार 8 ऑगस्ट रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. ज्या नागरिकांना महानगरपालिकेसंबंधी लोकशाही दिनी शासन निर्णयानुसार तक्रारी दाखल करावयाच्या आहेत त्यांनी वर नमुद दिवस वेळेत मनपा प्रशासकीय इमारतीच्या दुसर्या मजल्यावरील सभागृहात उपस्थित रहावे. तसेच फक्त वैयक्तीक तक्रारी स्विकारल्या जातील. सार्वजनिक तक्रारी स्विकारण्यात येणार नाहीत व प्रत्येक महिन्याच्या 15 दिवसाचे आत आपल्या तक्रारी दाखल करव्यात असे आवाहन सहाय्यक आयुक्त मनपा यांनी केले आहे.