महानगरीसह सचखंडला रावेर थांब्यासाठी प्रयत्न

0

खासदार रक्षा खडसेंचा रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा

रावेर- रावेर रेल्वे स्टेशनावर लवकरच महानगरी किंवा सचखंड एक्सप्रेसला थांबा मिळणार असून त्यासाठी खासदार रक्षा खडसे यांनी रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्याकडे मागणी लावून धरली आहे. रावेर परिसरातून जळगाव जाण्यासाठी सुमारे हजार ते दोन हजार नागरिक दरोरोज रोजगार नोकरी, व्यापाराच्या कामासाठी अप-डाऊन करतात. अनेक वर्षापासून रावेर रेल्वे-स्टेशनावर महानगरी, सचखंड एक्सप्रेसला थांबा मिळण्याची मागणी असून यापूर्वी सुध्दा प्रवासी संघटनांतर्फे भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन यांनीदेखील मागणी करून रेल्वे विभागाला निवेदन दिले आहे

कामायनी, ताप्तीगंगा पासून सुरू आहे प्रतीक्षा
मागील 25 वर्षाची रेल्वे थांब्याची मागणी तत्कालीन खासदार हरिभाऊ जावळे यांनी पूर्ण केली होती याचाच फायदा त्यांना होऊन 2014 मध्ये लोकसभेचे टिकिट कापल्यावर सुध्दा रावेर परीसरातील लोकांनी त्यानां भर-भरून मतदान करून आमदार केले आहे तेव्हा.पासून महानगरी किंवा सचखंड गाडीला थांब्याची विविध प्रवाश्यांकडून मागणी होत आहे