महानगरी एक्सप्रेसचे चाळीसगावात जोरदार स्वागत

0

रेल्वे इंजिन चालकाचा केला सत्कार
चाळीसगाव – महानगरी एक्सप्रेससह इतर रेल्वे गाड्यांना चाळीसगाव रेल्वेस्थानकावर थांबा मिळावा यासाठी चाळीसगावकरांची गेल्या दोन वर्षांपासून मागणी होती. खासदार ए.टी.नाना पाटील यांच्या प्रयत्नामुळे अखेर महानगरी एक्सप्रेसला चाळीसगावला थांबा देण्याची मंजूरी रेल्वे प्रशासनाने दिली होती. मंगळवार २२ जानेवारी रोजी सकाळी महानगरी एक्सप्रेस चाळीसगाव रेल्वेस्थानकावर आल्यानंतर चाळीसगावकरांनी मोठ्या जल्लोषात स्वागत केले.

चाळीसगाव रेल्वेस्थानकारवर सकाळी ७.५५ वाजता मुंबईकडे जाण्यासाठी महानगरी एक्सप्रेसला थांबा मिळाल्यानंतर विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह चाळीसगावकरांनी स्वागत केले. यावेळी खासदार ए.टी.नाना पाटील आणि रेल्वे इंजिन चालक यांचे चाळीसगाव रेल्वे स्थानकावर स्वागत केले. यावेळी खासदार ए.टी.नाना पाटील, आमदार उन्मेश पाटील, भाजपाचे तालुकाध्यक्ष के.बी.साळुंखे, नगरसेवक घृष्णेश्वर पाटील, पं.स.सभापती स्मितल बोरसे, उपसभापती संजय पाटील, विश्वास चव्हाण यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी, प्रवाशी आदी उपस्थित होती.