महानगरी एक्सप्रेसमध्ये चोरीत सहा हजारांचा ऐवज लंपास

0

भुसावळ । गाडी क्रमांक 11094 महानगरी एक्सप्रेस मधून प्रवास करणार्‍या प्रवाशाची बँग भुसावळ रेल्वे स्थानकावर चोरी झाल्याची घटना घडली. याबाबत लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजयकुमार समरबहाद्दुर यादव (वय 24, रा. सदेरपूर पोलीस स्टेशन लोकमनपूर ता. होडीया जि. इलाहाबाद. यू.पी.) हे गाडी क्र. 11094 अप महानगरी एक्सप्रेसच्या डबा क्र.एस8 बर्थ क्र. 63 वरून प्रवास करत असतांना गाडी सकाळी 6वाजता भुसावळ स्थानकावर थांबली असता झोपेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने त्यांची रिबॉकची बँग चोरी केली. या बॅगमध्ये 6 जोडी कपडे, बँक आँफ बडोदा 2एटीएम, पंजाब नँशशल बँक एटीएम, आयसीआयसीआय बँक एटीएम व क्रडीट कार्ड, ड्रायव्हीग लायसन, मतदान कार्ड.आधार, पँनकार्ड व6हजार180रूपयांची चोरी केली.याबाबत अजय कुमार यांच्या फिर्यादीवरून लोहमार्ग पोलिसात अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक अलका अढाळे करित आहे.