पाठपुराव्याला यश ; प्रायोगिक तत्वावर सहा महिने दिलासा
भुसावळ:- अप व डाऊन 11093-11094 मुंबई-वाराणसी (महानगरी) एक्स्प्रेसला प्रायोगिक तत्वावर 30 मार्चपासून पाचोरा रेल्वे स्थानकावर प्रायोगिक तत्वावर सहा महिन्यांसाठी थांबा देण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या गाडीला येथे थांबा देण्याची मागणी होत होती. पाठपुराव्याला यश आले असून चाकर मान्यांसह व्यापारीवर्गाची यामुळे मोठी सोय होणार आहे. या शिवाय ठाणे येथे 2 एप्रिलपासून 12105 मुंबई-गोंदिया (विदर्भ एक्स्प्रेसला) व 12111 व 11112 मुंबई-अमरावती (अमरावती एक्स्प्रेस) ला ठाणे येथे थांबा देण्यात आला आहे तसेच 4 एप्रिल पासून मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर 12405 व 12406 भुसावळ-हजरत निजामुद्दीन (गोंडवाना) एक्स्प्रेसला 5 एप्रिलपासून थांबा देण्यात आल्याचे भुसावळ रेल्वे विभागाने कळवले आहे.