महानिर्मिती निम्नस्तर लिपिक परीक्षा लवकरच

0

2017 मध्ये अर्ज केलेले उमेदवार नवीन परीक्षेस पात्र
भुसावळ/जळगाव । महानिर्मिती 11सप्टेंबर 2017 अन्वये प्रसिद्ध करण्यात आलेल्या निम्नस्तर लिपिक (मासं) व निम्नस्तर लिपिक (लेखा) या पदांच्या सरळसेवा भरतीच्या अनुषंगाने सदर पदांची ऑनलाईन परीक्षा 11 व 12 नोव्हेंबर 2017 रोजी घेण्यात आली होती. सदर ऑनलाईन परीक्षेदरम्यान औरंगाबाद येथील परीक्षा केंद्रातील पेपरफुटीच्या प्रकरणाबाबत गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास सुरु आहे. दरम्यान, गुन्ह्याबाबतचा नेमका तपशील महानिर्मिती संकेतस्थळावरील अधिसूचनेत देण्यात आलेला असल्याची माहिती महानिर्मितीतर्फे करण्यात आले आहे.

सदरील पदांच्या परीक्षेत पारदर्शकता असावी याकरिता, हि ऑनलाईन परीक्षा प्रशासकीय कारणास्तव रद्दबातल करण्यात येत असून, ह्याबाबतचा एस.एम.एस./ई-मेल संबंधित उमेदवारांना पाठविण्यात येत आहे. लवकरच ह्या पदांची ऑनलाईन परीक्षा पुनश्‍च घेण्यात येणार आहे. ज्या उमेदवारांनी 2017 मध्ये अर्ज केला होता ते सर्व उमेदवार नव्याने होणार्‍या परीक्षेस पात्र राहतील. सविस्तर तपशील, महानिर्मितीच्या www.mahagenco.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, याची संबंधित सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.