महापरिनिर्वाणदिनाच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईसाठी विशेष नऊ गाड्या

0

भुसावळ :महापरीनिर्वाण दिनाच्या पार्श्वभुमीवर मध्य रेल्वे प्रशासनाकडून गाड्यांना होणार्‍या गर्दीच्या पार्श्वभुमीवर विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे भाविकांची मोठी सोय होणार असून गाड्यांची गर्दीही कमी होणार आहे. महापरीनिर्वाण दिनानिमित्त नागपूर-मुंबई दरम्यान नऊ गाड्या चालविल्या जाणार आहे.

अजनी मुंबई सुपरफास्ट विशेष गाडी

मध्य रेल्वे प्रशासनाकडून अजनी-मुंबई या दरम्यान विशेष गाडी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अप अजनी -मुंबई (02040) ही गाडी शनिवार, 7 डिसेंबरला अजनी येथून दुपारी तीन वाजता सुटणार आहे. दुसर्‍या दिवशी मुंबईला सकाळी 5.10 वाजता ही गाडी पोहोचेल. या गाडीची फक्त एकच फेरी होणार आहे. ही गाडी वर्धा, पुलगांव ,धामणगांव, बडनेरा, अकोला , शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक, इगतपुरी, कल्याण, दादर येथे ही गाडी थांबणार आहे.

या गाड्या नागपूर-मुंबई धावणार

नागपूर-मुंबई दरम्यान अप नागपूर-मुंबई (01262) ही गाडी बुधवार, 4 डिसेंबर रोजी नागपूर स्थानकावरून रात्री 11.55 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी ही गाडी दुपारी 2.35 वाजता मुंबईला पोहोचणार आहे. अप नागपूर-मुंबई (01264) ही गाडी गुरुवार, 5 डिसेंबर रोजी सकाळी 7.50 वाजता नागपूर येथून सुटून दुसर्‍या दिवशी रात्री 12.10 पोहोचणार आहे. गाडी (01266) अप नागपूर-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी गुरुवार, 5 डिसेंबर रोजी नागपूर येथून दुपारी 3.55 वाजता मुंबईसाठी सुटणार आहे. दुसर्‍या दिवशी 11.35 वाजता ही गाडी मुंबईत पोहोचणार आहे. या गाड्या अजनी, सेवाग्राम, वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, मुर्तीजापूर, अकोला, जलंब, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिकरोड, ईगतपुरी, कसारा, कल्याण, दादर येथे थांबणार आहे.

मुंबई-नागपूर विशेष गाडी

गाडी 01255 डाऊन मुंबई-नागपूर ही गाडी शनिवार, 7 डिसेंबर रोजी दुपारी 12.35 वाजता मुंबई येथून सुटणार असून नागपूरला ही गाडी पहाटे 3.30 वाजता पोहोचणार आहे. तसेच डाऊन मुंबई-नागपूर (01257) ही गाडी रविवार, 8 डिसेंबरला सायंकाळी 6.40 वाजता मुंबईतून सुटणार आहे. डाऊन दादर अजनी एक्स्प्रेस ही गाडी रविवार, 8 डिसेंबर रात्री 12.40 वाजता सुटणार आहे. अजनीला ही गाडी दुपारी चार वाजता पोहोचणार आहे. ही गाडी दादर, कल्याण, कसारा, ईगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मुर्तीजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम व अजनी येथे थांबणार आहे.

मुंबई-अजनी, नागपूर दरम्यान विशेष गाड़ी

01249 डाऊन मुंबई-अजनी एक्स्प्रेस ही गाडी शुक्रवार, 6 डिसेंबरला मुंबई येथून दुपारी 4.05 वाजता सुटणार असून ही गाडी अजनी येेथे सकाळी 9.30 वाजता पोहोचणार आहे तसेच 01251 डाऊन मुंबई सेवाग्राम एक्स्प्रेस ही गाडी सुध्दा शुक्रवार, 6 रोजी मुंबई येथून सायंकाळी 6.40 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी सकाळी सेवाग्रामला ही गाडी 10.30 वाजता पोहोचणार आहे. डाऊन दादर अजनी (01253) ही गाडी शनिवार, 7 डिसेंबर रोजी रात्री 12.40 वाजता सुटणार आहे. ही गाडी अजनी येथे दुपारी 3.55 वाजता पोहोचेल.