महापरिनिर्वाणदिनी महामानवास अभिवादन

0

धुळे । 6 डिसेबर रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. तेव्हा पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी बाबासाहेबांचा 61 वा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला. शाळा, महाविद्याल, शासकीय कार्यालये, राजकीय पक्ष, खाजगी संस्था यांच्याकडून महामानवास महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. मानवाच्या आठवणीस यावेळी उजाळा देण्यात आला.

आदिवासी भागात अभिवादन
शिरपूर। तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषद मराठी उच्च प्राथमिक शाळेत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमात डॉ.बाबासाहेब यांच्या कार्याविषयी मुख्याध्यापक अनिल महिरराव यांनी माहिती दिली. आजच्या विद्यार्थ्यांनी डॉ.बाबासाहेबांचा आदर्श घेऊन आचरण करावे. या कार्यक्रमाला शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रविंद्र पावरा, प्रेमराज बंजारा, मोहन पावरा, बापु गोपाळ, अंगणवाडी ताई जिनीता पावरा, बोमल्यापाडा शाळेचे मुख्याध्यापक नागराज चव्हाण, शिक्षक -अशोक पाटील, शिवराम पाडवी, सुरसिंग पावरा, वंदना कोळी उपस्थित होते.

सर्वपक्षीय आदरांजली
धुळे । भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त जेलरोडवरील पुर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. सर्वपक्षीय नेते तसेच कार्यकर्ते यावेळी हजर होते. यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख हिलाल माळी, विरोधी पक्षनेते गंगाधर माळी, अतुल सोनवणे, महेश मिस्तरी, किरण जोंधळे, सुनिल बैसाणे, वाल्मिक दामोदर, संजय पगारे, शशिकांत वाघ, शंकरराव थोरात, संजय जवराज, रत्नाकर वसईकर, संजय बैसाणे, भैय्या पारेराव, योगेश जगताप, नरेश दामोदर, भरत खरात, श्रीकृष्ण बेडसे, महेंद्र शिरसाठ, नरेंद्र अहिरे, शेखर वाघ, संजय जवराज, कैलास पाटील, योगेश चौधरी, छोटू खरात आदी उपस्थित होते.

बळसाणे शाळेत अभिवादन
बळसाणे । डिसेंबर रोजी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाणदिन बळसाणे शाळेत साजरा करण्यात आला. या निमित्ताने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पुजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक सुनिल सोंजे होते. वैशाली कोळी, भुपेश काटे, वसंत चौरे, महेंद्र सोनवणे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामदास साबळे यांनी केले तर सुत्रसंचालन किशोर काकुस्ते यांनी केले.

शिरपूर । भारतीय राज्यघटनेमुळे आज सर्व जातीधर्माच्या लोकांना शिक्षणाचे, व इतर सर्व अधिकार मिळाले आहेत. देशात सर्वधर्मसमभाव आहे याचे संपुर्ण श्रेय भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाच आहे असे प्रतिपादन टी.टी.बडगुजर यांनी केले. बोराडी येथील मातोश्री बनुमाय कन्या विद्यालयात महापरीनिर्वाण दिवस संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाखाप्रमुख टी. टी.बडगुजर होते. यावेळी पर्यवेक्षक एस.आर.बडगुजर, एन.एम.सोनवणे, सी.एम.कुलकर्णी, व्ही.पी.पवार, टी.टी.ढोले, बी. एन. ठाकरे, जे.पी.पावरा, डी.जे.चव्हाण, सी.एस.बडगुजर, निरज निकम, मधुकर सोनवणे, राजेंद्र गिरासे, सचिन पवार, भिमराव धनगर आदी उपस्थित होते. सुत्रसंचालन व्ही. पी.पवार यांनी केले तर जी.सी.भामरे यांनी आभार मानले.

शिरपूर भाजपातर्फे अभिवादन
शिरपूर। घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुण्यतिथीनिमित पुताळ्यास फुलहार अर्पण अभिवादन करण्यात आले. शिरपुर शहरातील डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यान मधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुताळास भाजपा धुळे जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांचा हस्ते फुलहार अर्पण करुण आदरांजली वाहण्यात आली. भाजपा अनु.जाती.मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रताप सरदार यांनी अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन केले. यावेळी अरुण धोबी, उपाध्यक्ष किशोर माळी, चिटणीस संजय आसापुरे, शहराध्यक्ष हेमंत पाटील, युवा मोर्चा शहराध्यक्ष विक्की चौधरी, जितेंद्र गिरासे आदी उपस्थित होते.

आर.सी.पटेल शाळा
वाघाडी । आर.सी.पटेल प्राथमिक शाळा रामसिंगनगर शिरपूर येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रतिमापूजनाचा कार्यक्रम झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर.बी.खोंडे होते. प्रारंभी शाळेच्या ज्येष्ठ शिशिका एस.एस.पावरा यांच्याहस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. यानंतर 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांनी मनोगते व्यक्त केली. याप्रसंगी शाळेचे एस.एस.सुर्वे, व्ही.ओ.माळी, एस.वाय.चव्हाण, एन.आय.राजपूत, ए.बी. हातेडकर, टी.ए.पाटील, वाय.बी.कुमावत उपस्थित होते. सुत्रसंचलन एच.एम.मोरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी के.आर.अलकारी, बी.ए. पवार, एम.एम.निकम यांनी परिश्रम घेतले.