प्रवाशांना दिलासा ; भुसावळ व मुंबई पॅसेंजरला दोन अतिरिक्त डबे
भुसावळ – महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी दादर ते नागपूर दरम्यान विशेष नऊ रेल्वे गाड्या प्रवाशांच्या सोयीसाठी 4 ते 8 डिसेंबर दरम्यान धावणार असून भुसावळ व मुंबई पॅसेंजरला तसेच कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेसला अतिरिक्त दोन बोग्या लावण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.
पॅसेंजर गाड्यांना जादा डबे
चैत्यभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता प्रवाशांची गैरसोय न होण्यासाठी रेल्वे प्रशासनाने 5 ते 7 डिसेंबर दरम्यान 51154 भुसावळ-मुंबई पॅसेंजर, 51153 भुसावळ-मुंबई पॅसेंजरला अतिरिक्त दोन बोगी लावण्याचा निर्णय घेतला आहे तसेच याच कालावधीत 11030 कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस व 11029 मुंबई-कोल्हापूर एक्स्प्रेसला अतिरिक्त दोन बोगी जोडण्यात येतील. रेल्वे प्रवाशांनी अधिकृत तिकीट घेवून प्रवास करावा व रेल्वे बोग्यांवर चढून प्रवास करू नये, असे आवाहन भुसावळ विभागाचे डीआरएम आर.के.यादव यांनी केले आहे.