महापरीनिर्वाण दिनानिमित्त दहा विशेष रेल्वे गाड्या

0

रेल्वे प्रवाशांनी तिकीट काढून प्रवास करण्याचे रेल्वे प्रशासनाचे आवाहन

भुसावळ- महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील दादरच्या चैत्यभूमीवर देशभरातून येणार्‍या लाखो अनुयायींची संख्या पाहता प्रवाशांची गैरसोय टळण्यासाठी रेल्वे प्रशासनाने दहा विशेष रेल्वे गाड्या 4 ते 7 डिसेंबरदरम्यान चालवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे प्रवाशांनी रेल्वे तिकीट काढून प्रवास करावा तसेच विद्युतीकरण झाल्याने रेल्वे डब्ब्यांवर बसून प्रवास करू नये, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

अशा आहेत विशेष गाड्या
4 रोजी 01262 नागपूर-मुंबई, 5 रोजी 01264 व 01266 नागपूर-मुंबई विशेष गाडी धावणार आहे. या गाड्यांना अजनी, सेवाग्राम, वर्धा, धामणगाव, पुलगाव, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, जलंब, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, नाशिक, ईगतपुरी, कसारा, कल्याण, दादर या ठिकाणी थांबा देण्यात आला आहे.
तसेच 6 रोजी 01249 मुंबई-अजनी तसेच याचदिवशी 01251 मुंबई ते सेवाग्राम, 7 रोजी 01253 दादर ते अजनी तसेच याच दिवशी 01255 मुंबई ते नागपूर तसेच 8 रोजी 01257 मुंबई-नागपूर, 8 रोजी 01259 दादर ते अजनी विशेष गाडी धावणार असून या गाड्यांना दादर कल्याण, कसारा, ईगतपुरी, नाशिक, मनमाड, चाळीसगाव, जळगाव, भुसावळ, मलकापूर, जलंब, अकोला, मुर्तिजापूर, बडनेरा, धामणगाव, पुलगाव, वर्धा, सेवाग्राम, अजनी या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. 02040 अजनी ते मुंबई हे गाडी 7 रोजी धावणार असून या गाडीला वर्धा, धामणगाव, पुलगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, नाशिक, ईगतपुरी, कल्याण, दादर या स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.