जळगाव । आज महापौर ललित कोल्हे यांनी मान्सूनपुर्व बैठकीत नाल्या सफाई बाबात माहिती जाणून घेतली. यावेळी आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी शहरातील 67 उपनाल्यांपैकी 42 नाल्यांची सफाईचे काम पुर्ण झाले असल्याची माहिती दिली. तसेच उर्वरीत उपनाल्यांची साफईचे काम 7 जून पर्यंत पुर्ण होईल अशी माहिती दिली. बैठकीला नगरसेवक नितीन बरडे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, शहर अभियंता डी. बी. दाभाडे, बांधकाम अभियंता सुनील भोळे, आरोग्य अधिकारी उदय पाटील, प्रभाग अधिकारी व्ही. ओ. सोनवणी, संजय नेमाडे, सुनील साळुंखे, संजय पाटील, मलेरीया अधिकारी सुनील पांडे, आरोग्य अधिक्षक ए. एन. नेमाडे, एस. पी. अत्तरदे, एस. बी. बडगुजर आदी उपस्थित होते.
आयुक्तांनी घेतली दखल
दरम्यान, आयुक्त चंद्रकांत डांगे यांनी रेल्वेतर्फे गटारीचे काम गुरुवारी रात्री सुरु करण्यात येणार असल्याची माहिती पत्रकारांना दिली. या गटारीमध्ये डबर टाकल्याने गटारीतील पाणी रस्त्यावर आल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
ठेकेदारांकडून दंड वसूल करा
आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी उपनाल्यांची सफाई करण्याचे उद्दीष्ट हे 31 मे होते. परंतु, जेसीबी बंद पडल्याने उपनाल्यांची सफाईंचे काम थांबले असल्याची माहिती महापौर कोल्हे यांना दिली. यावर महापौर कोल्हे यांनी तत्काळ नाले सफाईसाठी दोन जेसीबी भाड्याने घेवून काम पुर्ण करण्याची सूचना केली. भावसार मढी येथील गटर चोकअप झाली असल्याने तेथील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याचे महापौर कोल्हे यांनी सांगितले. भावसार मढीची सफाईचा ठेका देण्यात आल्याने तेथे अस्वच्छता असल्याने ठेकेदाराकडून दंड वसूल करण्याची सूचना महापौर कोल्हे यांनी यावेळी दिला.
रेल्वे अधिकार्यांशी साधला संपर्क
अधिकार्यांच्या पथकाने रेल्वे सुपरवायझर विजय चव्हाण यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी वर्मा नामक अधिकार्यांशी भ्रमणध्वनीव्दारे संपर्क साधून संबंधीत बाब त्यांच्या निदर्शनास आणून दिली. ही गटर वळवून शिवाजी नगर पुलाकडे जाणार्या गटारीला जोडली जाणार असल्याची माहिती आरोग्य अधिकारी उदय पाटील यांनी यावेळी दिली.
‘ती’ गटार शिवाजीनगर पुलाकडील गटारीला जोडणार
रेल्वे स्टेशन भागांतील सेवाश्रमपर्यंतचा रस्त्याच्या बाजूला असलेली मुख्य गटार बुजविण्यात आली असल्याची माहिती महापौर कोल्हे यांनी बैठकीत दिली. गटार बुजविल्याने त्यातील सांडपाणी रस्त्यांवर आले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचेही महापौर कोल्हे यांनी स्पष्ट केले. यावेळी अधिकार्यांनी ती जागा रेल्वेच्या ताब्यात असल्याचे महापौरांच्या निदर्शनास आणून दिले असता. महापौरांनी अधिकार्यांना डीआरएम यांच्यासोबत बोलून तोडगा काढण्याची सूचना केली. यानुसार शहर अभियंता डी. बी. दाभाडे, बांधकाम अभियंता सुनिल भोळे, आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्या पथकाने दुपारी 3 वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष जावून गटारीच्या स्थितीबाबत माहिती जाणून घेतली. रेल्वेकडून स्टेशनजवळ सरकता जिना तयार केला जाणार आहे. तेथे सरकत्या जिन्याचे फाऊंडेशन करण्यात येणार असून महापालिकेची मुख्य गटर बुजविण्यात आली असल्याचे निदर्शनास आले.