महापालिका अतिक्रमण विभागाच्या कर्मचार्‍यांना जीवे मारण्याची धमकी

0

अतिक्रमणाच्या कारवाईवरुन वाद ः शनिपेठ पेालीस ठाण्यात गुन्हा दाखल

जळगाव– शहरातील काट्याफाईल परिसरात अतिक्रमण काढण्याची कारवाई करणार्‍या महापालिका कर्मचार्‍यांना धक्काबुक्की करुन हातात काठी तसेच दगड घेवून
विक्रेत्यांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार बुधवारी दुपारी सव्वा तीन वाजता घडला. याप्रकरणी विक्रेते जितेंद्र पाटील व मिना सिताराम राणे दोन्ही रा. हरिविठ्ठल नगर यांच्याविरोधात शनिपेठ पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी धर्मेद्र रामबक्ष चांगरे, ज्ञानेश्‍वर कोळी, किशोर सोनवणे, रमेश कोळी, रमेश शंकपाळ, दिपक कोळी, कैलास सोनवणे, हिरामण
सपकाळे, विलास चौधरी, राजेश बाविस्कर, राजेंद्र वाघ हे 28 रोजी शहरातील काट्याफाईल परिसरात रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणार्‍या विके्रत्यांवर कारवाई
करत होते. यादरम्यान जितेंद्र पाटील या विक्रेत्याने आम्हाला नेहमी त्रास देतात असे म्हणून शिवीगाळ तसेच अरेरावी करुन कर्मचार्‍यांना धक्काबुक्की केली, तसेच काठीने मारुन टाकीन अशी धमकी दिली. याचवेळी मिना सिताराम राणे हिनेही हातात दगड घेवून, तुम्हाला मारुन टाकीन अशी धमकी महापालिका कर्मचार्‍यांना दिली. यादरम्यान महापालिका कर्मचार्‍यांनी जप्त करुन शासकीय वाहनात टाकलेला वजनकाटाही विक्रेता जितेंद्र पाटील याने वाहनातून काढून घेतला. अशा आशयाच्या महापालिका कर्मचारी धर्मेंद्र रामबक्ष चांगरे वय 5252 रा. मोहाडी रोड, नेहरुनगर यांच्या फिर्यादीवरुन दोघांविरोधात शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक खेमचंद परदेशी करीत आहेत.