फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनची माहिती
पिंपरी चिंचवड : मागील काही दिवसांपूर्वी फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन च्यावतीने पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त दिलीप गावडे यांना औद्योगिक समस्या मार्गी लावण्याकामी महापालिकेने लक्ष देवून पाहणी दौरा करावा. याबाबत निवेदन दिले होते. निवेदनाची दखल घेत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे यांनी शुक्रवार (दि. 30) रोजी भोसरी येथील एम. आय. डी. सी. परिसरास भेट दिली. तसेच परिसराची पाहणी करून येथील उद्योजकांच्या समस्या जाणून घेतल्या. परिसरात महिला स्वच्छतागृह नसल्यामुळे या ठिकाणी विविध कंपनीत कामास येणार्या महिलांना गैरसोयींना सामोरे जावे लागते. पर्यावरण उद्यानामध्ये उद्योजकांसाठी जॉगिंग पार्क, कामगार वर्गासाठी उद्यानांमध्ये बसण्यासाठी बैठक व्यवस्था तसेच शौचालय आणि पाण्याची व्यवस्था आदी सुविधांबाबत मागणी करण्यात आली.
अधिकार्यांनी केली समस्यांची पाहणी…
यावेळी प्रशासन अधिकारी व क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत, आरोग्य अधिकारी, फोरमचे अध्यक्ष अभय भोर, सदस्य संतोष गायकवाड, राहुल भगत, कार्तिक गोवर्धन, दिनेश रोहरा आदी उपस्थित होते. भोर यांनी महापालिकेच्या अधिकार्यांना यावेळी पर्यावरण संस्कार उद्यान तसेच समस्या प्रत्यक्ष दाखवून दिल्या. यासह एम.आय.डी.सी. परिसरातील इतर ठिकाणी जाऊन तेथील भागांची पाहणी केली. परिसरातील ड्रेनेज सुविधा, कचरा समस्या व इतर भागातील रस्त्याची पाहणी करण्यात आली.
उद्योजक कामगारांशी संवाद…
आयुक्त गावडे यांनी परिसरातील उद्योजकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. तसेच कामगार वर्गाशी संवाद साधून, परिसरास आवश्यक गोष्टींची माहिती घेतली. घटनास्थळाची पाहणी करून, सहाय्यक आयुक्त गावडे यांनी लवकरात लवकर एम. आय. डी. सी. परिसरातील समस्या सोडवल्या जातील, असे आश्वासन फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या पदाधिकार्यांना दिल्याचे फोरमचे अध्यक्ष सोपानराव भोर यांनी सांगितले.