पिंपरी : शहरातील दररोज 100 किलोंपेक्षा जास्त ओला कचरा करणार्या हौसिंग सोसायट्यांचा कचरा 1 एप्रिलपासून महापालिकेच्या वतीने स्वीकारण्यात येणार नाही.
ओला कचरा जिरविण्याची व्यवस्था सोसायटीला करणे बंधनकारक असणार आहे. केवळ सुका कचरा स्वीकारला जाणार आहे. 75 पेक्षा जास्त सदनिका असणार्या सोसायट्यांचा यामध्ये समावेश आहे. संबंधित सोसायट्या व आस्थापनांनी खत निर्मिती प्रकल्पाची व्यवस्था करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत दिली आहे.